सर्वांना माहिती आहे की आपल्या देशावर कित्येक वर्ष ब्रिटिशांनी राज्य केले आणि आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून हजारो जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या वेळी ब्रिटिश आणि त्यांचे कायदे आपल्या देशामध्ये लागले त्याच्या कायद्याचा जो कोणी विरोध करत त्यांच्यावर अत्याचार करत.
13 एप्रिल 1919 साली ज्यावेळेस जालियनवाला बाग हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली तेव्हा भगतसिंग, उधमसिंग, सुखदेव, राजगुरू आणि असे अनेक क्रांतिकारी निर्माण झाले होते. कारण ही घटना एवढी वाईट होती की जनरल डायर नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी लहान मुले वृद्ध स्त्रिया अशा हजारो लोकांना मारून टाकले होते या घटनेनंतर सगळ्या भारतीयांच्या हृदयामध्ये स्वातंत्र्याचे आग धगधगू लागली होती प्रत्येक जण भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान द्यायला तयार होता नंतर 26 जानेवारी 1930 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेसने ब्रिटिशांकडे पूर्ण स्वराज्याची मागणी केली. त्यावेळेस त्यांनी लाहोरमध्ये रावी नदीच्या किनारी तिरंगा फडकावला हा दिवस संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या नंतर ब्रिटिशांची मनमानी आणि दुसरे महायुद्ध भारताला यामुळे स्वातंत्र्य साठी जास्त काळ लढा द्यावा लागला झाला. आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले भारत स्वतंत्र झाला होता.
पण भारताकडे स्वतःचे संविधान नव्हते मित्रांनो एक छोटी संस्था चालवायची झाली नियम बनवावे लागतात आपला भारत देश हा एवढा मोठा ज्याच्या मध्ये वेगळे राज्य आहेत ते चालवण्यासाठी आपल्याला काही नियम मनवावे लागणार होते म्हणून हे संविधान इंग्लिश मध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो हे बनवण्यासाठी 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली.
![]() |
| डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर |
4 नोव्हेंबर 1947 रोजी समितीने विधानसभेसमोर आपला पहिला मसुदा सादर केला विधानसभेत 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात अनेक क्षेत्रांमध्ये या संविधानावर चर्चा आणि सुधारणा जनतेसाठी खुले होते स्वतंत्र मागणी सोबतच स्वातंत्र्याची मागणी सुद्धा ब्रिटिशांनी मान्य केले आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान तयार झाले होते. संविधान कधी अमलात आणायचे यावर नेत्यांची चर्चा झाली.
त्याच्या मनात 26 जानेवारी ही तारीख आणि कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर मध्ये रावी नदीच्या किनारी तिरंगा फडकवला होता आणि पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती 24 जानेवारी 1950 रोजी विधानसभेच्या 308 सदस्यांनी मसुदा मान्य केला आणि संविधानाच्या दोन हस्तलिखित प्रती काढल्या हिंदी मध्ये होती आणि दुसरी इंग्रजी मध्ये दोन दिवसांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी झाली आणि भारत गणराज्य बनले मित्रांनो आता तुम्हाला समजले असेल की 26 जानेवारीला पण संविधान अमलात आणले गेले म्हणून आपणा प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो.

No comments:
Post a Comment