Dr Ambedkar scholarship Yojana

Dr Ambedkar scholarship Yojana
Dr Ambedkar scholarship Yojana

शिवशक्ती - भीमशक्ती युतीची घोषणा.

 शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत सोमवारी शिवशक्ती-भीमशक्ती युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली.


'नया रास्ता, नया रिश्ता' असे ठाकरे यांनी या युतीचे वर्णन केले. निवडणुकीच्या राजकारणातील बदलाला सुरुवात झाल्याची भावना आंबेडकर यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.


 युतीची औपचारिक घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांनी आपापल्या मित्रपक्षांना सांभाळायचे, असे धोरण आधीच ठरले आहे. त्यानुसार माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला आहे. पुढील वाटचाल एकत्र करण्यासाठी आज आंबेडकर भवनाच्या वास्तूत आम्ही एकत्र आलो आहोत. 




सोबत येतील : आंबेडकर आज राजकारणामध्ये ज्या काही वाईट परंपरा आणि चाली चाललेल्या आहेत, त्यावर आघात करून त्या मोडून टाकण्यासाठी ठाकरे आणि आंबेडकर यांच्या पिढ्यांचे वारसदार एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


'प्रथम देशहित,' हीच आमची भूमिका आहे. देशात सध्या भ्रम पसरविण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. हुकूमशाहीकडे वाटचाल ही अशीच होते. जनतेला भ्रमात ठेवायचे, नको त्या वादात अडकवून ठेवायचे आणि आपला हेतू साध्य करून घ्यायचा. 


याच वैचारिक प्रदूषणातून देशाने मोकळा श्वास घेण्यासाठी, देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, घटनेचे महत्त्व, संविधानाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, अशी घोषणा ठाकरे यांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment