Dr Ambedkar scholarship Yojana

Dr Ambedkar scholarship Yojana
Dr Ambedkar scholarship Yojana

बाबासाहेबांनी मूकनायक का सुरू केले.||PART 1||

 कोलंबिया विद्यापीठातून परतलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगभरातल्या कोणत्याही परिवर्तनाच्या चळवळीसाठी आवश्यक असलेल्या स्वतःच्या मुखपत्राचे आवश्यकता पटलेली होती. पण  अस्पृश्यांच्या प्रश्नांची वृत्तपत्र व त्यांच्या राजकीय धोरणाचे मांडणी करणारा कोणतेही वृत्तपत्र  भारतात अस्तित्वात नव्हत त्या काळात प्रस्तावित अशा कोणत्याही वर्तमानपत्राला निकडही वाटत नव्हती. 

1917 मध्ये साऊथबरो कमिशनसमोर तत्कालीन अस्पृश्य वर्गासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व असावं अशी साक्ष नोंदवण्यासाठी जो संघर्ष बाबासाहेबांना करावा लागला तेव्हा त्यांच्या ध्यानात आलं होतं त्यातूनच मूकनायक या आंबेडकरी चळवळीच्या पहिल्या मुखपत्रा चा जन्म झाला. ये वर्तमानपत्र सुरू करण्याच्या मागे पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर ती अशी दिसते की त्या काळातली भारताची मुख्य धारेतील पत्रकारिता हे मुख्य प्रवाहात की पत्रकारिता आहे. त्याच्यामध्ये केसरी आणि अनेक वर्तमानपत्र आहे.

 त्यांच्यामध्ये दीनदुबळ्यांच्या प्रश्नांना त्यांच्या प्रश्नांना स्त्रियांच्या प्रश्नांना इतर मागासवर्गीयांच्या प्रश्नांना पुरेसं महत्त्व दिलं जात नव्हतं पुरेसा प्रभाव त्यांच्या प्रश्नांबद्दल या वर्तमानपत्रामध्ये उमटत नव्हता. ही एक अडचण बाबासाहेबांना जाणवत होती. 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक या पाक्षिकाचा पहिला अंक मुंबई प्रकाशित झाला.



 जो वर्ग एवढी शब्द मूकपणे अन्याय सहन करत होता त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा त्यांचा नायकत्व पद करणारा असा हा मूकनायक पण वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी पैसे आवश्यक असतात त्यावेळेस छत्रपती शाहू महाराज बाबासाहेबांच्या मागे उभे राहिले त्यांनी त्याकाळी दिलेल्या अडीच हजार रुपये देणगीतून मूकनायक सुरू झाला आपल्या मनोगत या मथळ्याखाली लिहिलेल्या पहिल्या लेखातच बाबासाहेबांनी लिहिलं आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचवण्यासाठी तसेच त्यांचे भावी उन्नती आणि तिथे मार्ग यांच्या खर्‍या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमान पत्रासारखी अन्य भूमीच  नाही; परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणाऱ्या आहे.

 इतर जातीच्या हिताची परवा त्यांना नसते इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना  अहितकारक असे ही त्यातून प्रल्हाद निघतात अशा वृत्तपत्रकार यांना आमचा एवढाच आहे की कोणतीही एखादी जात अवनत झाली तर  तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातींनाही बसल्याशिवाय राहणार नाही

No comments:

Post a Comment