रमाबाई यांचा जन्म 7 फेब्रुवारी 898 रोजी दाभोळ जवळील आनंद गावातील एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू भिकू धोत्रे व आईचे नाव रुक्मिणी भिकू धोत्रे असे होते. रमाबाई या त्यांच्या आई-वडिला-सह आपल्या दाभोळीजवळील वंणदगावात राहत होत्या. त्यांचे वडील भिकू धोत्रे हे दाभोळ बंदरातीलक माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असत. रमाबाई यांचे कुटुंब एक मोठे कुटुंब होतं. त्यांच्या परिवारात आई-वडिलांसोबत त्यांना तीन बहिणी एक भाऊ होता. मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते. रमाबाई लहान असतानाच त्यांच्यावर खूप मोठे संकट येऊन पडले त्यांच्या आई रुक्मिणी धोत्रे याचे आजारपणामुळे निधन झाले त्यामुळे रमाबाई याच्या कोवळ्या मनावर खूप मोठा आघात झाला.कालांतराने त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
आयुष्याच्या कोवळ्या वयातच त्यांच्यावर इतका मोठा प्रसंग उद्भवला होता. कारण त्यांच्यावर आपल्या लहान भाऊ आणि बहिणींची जबाबदारी आली होती. त्यानंतर त्या आपल्या वलंगकर काका व गोविंदपूरकर मामा यांच्यासोबत मुंबईतील भायखळा मार्केटच्या चाळीत राहायला गेले. रमाबाई आपल्या भावंडांसोबत मुंबईत आपल्या काका व मामा यांच्या सोबत राहत होत्या. त्या काळी बालविवाह ही प्रथा समाजात रूढ होती. त्यामुळे त्यांचा विवाह लहानपणी करण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर हे आपला मुलगा भीमराव आंबेडकर यांच्या करता मुलगी पाहत होते. त्यांना भायखळ येते लग्नाची मुलगी आहे असे समजले. त्यांनी वलंगकर यांना लग्नाची मागणी केली. रमाबाई व भिमराव आंबेडकर यांचे लग्न भायखळाच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. सन 1906 साली झाले.
![]() |
| रमाबाई भीमराव आंबेडकर |
लग्नाच्या वेळी भीमराव आंबेडकर यांचे वय 14 वर्षाची तर रमाबाई या केवळ 9 वर्षाच्या होत्या. रमाबाईंनी आपल्या जीवनात खुप दुःख सहन केले आहे. रमाबाई यांचे लग्न त्याकाळी बालविवाह प्रतीनुसार करण्यात आले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर बाबासाहेब इ.स. 1923 साली आपले पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले. त्यानंतर रमाबाई संपूर्णपणे एकट्या पडल्या. त्यांना जीवनात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी खूप कष्ट सहन करावे लागले. त्या जिद्दीने आपल्या दुःखाचा आणि अडचणींचा सामना करत होत्या. इ.स. 1923 साली बाबासाहेब लंडनला गेले होते. त्यावेळी रमाबाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्ते रमाबाई चे हाल पाहावले नाहीत त्यांनी काही पैसे जमा केले व ते पैसे रमाबाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला. पण ते घेतले नाही. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखाशी अडचणीशी गरीबीशी भांडत होती. दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारूण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने त्या काळात आपल्या आप्तजणांचे मृत्त्यू पाहिले. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यक्त होऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही. परदेशात जाऊन ज्ञान साधना करणार्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुखाची झळ पोहोचलेली नाही.
पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाबाई एका पडक्या घर चालण्यासाठी तिने शेन गोवऱ्या सरपणासाठी फिरले. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जात असत. बॅरिस्टरची पत्नी शेन वेचते म्हणून लोक नाव ठेवतील.म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री आठ नंतर गोवऱ्या थापायला वरळीला जात असत. मुलांसाठी उपास करत असत. अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेचे रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून अठरा-अठरा तास अभ्यास करू लागले. त्याच वेळी रमाईने आपल्या निष्ठेने त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.
डॉक्टर बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला रमाबाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती. म्हणून त्याने छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या. ते बोटीतून उतरतात त्यांच्या जय जयकाराने दुमदुमून गेले. अनेक जण त्यांना भेटत होते. हस्तांदोलन करत होते.पण रमाई मात्र कोपऱ्यात उभी होती. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते जवळ गेले. त्यांनी विचारले रामू तू का उभी राहिलीस. तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतुर झाला. असताना मी तुम्हाला अगोदर भेटणं योग्य नाही. मी तर तुमची पत्नी आहे. मी तुम्हाला कधीही भेटू शकते.
रमाईंनी 28 वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली.श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासन्तास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावर त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत. साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा असे म्हणत. आलेल्यांची रवानगी करताना करताना. त्याचे नाव गाव कामाचे स्वरूप पुन्हा कधी येणार आहात. हे सारे एका नोंदवहीत टिपण्यात सांगत. रमाईच्या शरीर काबाडकष्टांनी पोखरून गेले होते. रमाईचा आजार बाळाला होता. इ.स. 1935 च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढत चालला होता. मे 1935 ला तर आजार खूपच विकोपाल गेला.
बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता.एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले.
आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्न करीत असत पण अंगात त्रास नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्व:त बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही.
आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृह समोर लाखो लोक जमले होते. यशवंता बरोबर दिनांना पोरका करणारा दिवस उजाडला 27 मे 1935 रोजी सकाळी नऊ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली.


No comments:
Post a Comment